आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप धडक मोर्चा:मविआ सरकारचा घातपात करण्‍याचा विचार होता का ? विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा सवाल

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवाब मलिक यांच्‍या राजीनाम्‍यासाठी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवला आणि फडणवीस, पाटील, शेलार, दरेकर यांना ताबयात घेतले आहे. मोर्चेकऱ्यांनी विधानभवनावर धडकण्याचा अट्टाहास धरल्यानंतर पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रसाद लाड, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून निघून जाण्याचं आव्हान केले आहे. मात्र, मोर्चेकरी अजूनही घटनास्थळी आंदोलन करताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांनी मोर्चाच्या परिसरात बॅरिकेड्स लावून मोर्चेकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर पोलिसांना सहकार्य करा, त्यांच्याशी हुज्जत घालू नका, आपली लढाई पोलिसांसोबत नाही असं आवाहन फडणवीस यांनी मोर्चेकऱ्यांना केले आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप यांनी आज मोर्च्याची हाक दिली होती. त्यामुळे राज्यभरातून भाजपचे हजारो कार्यकर्ते आझाद मैदानात आले होते. यावेळी झालेल्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी संबोधित केले. फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर आझाद मैदानातून हा मोर्चा विधानभवनाच्या दिशेने निघाला. मात्र, मेट्रो सिनेमाजवळ मोर्चा येताच पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवले मात्र अगदी कमी अंतर पार करण्‍यासाठी पाऊण ते 1 तास लागल्‍याने यात सरकारचा काही घातपाताचा डाव होता का असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे. यानंतर पोलिसांनी सर्व भाजप नेत्‍यांना सोडून दिले.

बातम्या आणखी आहेत...