आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम कदम यांचा सवाल:म्हणाले- उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज शरद पवारांकडे दिलाय का? आणि जर नाही तर...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत नुकतीच एसटी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर 22 एसटी संघटनांच्या पदाधिकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता याच बैठकीवरुन भाजप नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधताना दिसत आहेत.

भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा चार्ज शरद पवार यांच्याकडे दिला आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. जर तसे नसेल तर ते घटनाबाह्य आहे. शरद पवार संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात? शरद पवार यांना बैठका घ्यायचाच असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत ? केवळ एकच निदान माफक अपेक्षा, असे राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राम कदम यांचे ट्विट...