आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेन ड्राईव्‍ह बॉम्‍ब:फडणवीस मुदस्सीर लांबे यांना विसरले का ? सना नवाब मलिक यांनी दोघांचा फोटो केला ट्विट

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अजून एक पेन ड्राईव्‍ह सादर केला. यात 31 डिसेंबर 2020 ला मुदस्सीर लांबेंच्‍याविरोधात एका 33 वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्‍यांना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमले होते. त्‍या महिलेने तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला तेव्हा लांबेने लग्न करण्याची तयारी दाखवली आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी या महिलेला दिली, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मात्र याच लांबे सोबतचा फडणवीस यांचा फोटो सना नवाब मलिक यांनी टविट केला आहे

.

देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेल्‍या आरोपांवर नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी ट्विटद्वारे उत्तर दिले आहे. सना मलिक यांनी मुदस्सीर लांबे हे वक्फ बोर्डात कधी दाखल झाले याची तारीख समोर आणली आहे. याशिवाय त्यांनी मुदस्सीर लांबे यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो देखील ट्विट केला आहे. या टविटमध्‍ये सना मलिक यांनी अर्धसत्य हे पूर्ण खोट असतं. डॉ. लांबे यांची नियुक्ती देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झाली होती, असे म्हटले आहे. तर डी गॅंगसोबत आणि त्‍यांच्‍या नातेवाईकांच्‍यासोबत फडणवीस यांचेच संबंध असल्‍याचा आरोप सना मलिक यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...