आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वावलंबन संकल्प अभियान:‘डिक्की’ने नवउद्योजक निर्माणाचे उद्दिष्ट ठेवावे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्टँड अप इंडिया’ या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी ‘डिक्की’तर्फे स्वावलंबन संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. देशहितासाठी नवीन उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन कार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) तर्फे ‘स्टँड अप इंडिया’अंतर्गत स्वावलंबन संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डिक्कीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, वेलिंगकर संस्थेचे समूह संचालक डॉ. उदय साळुंखे, सोहनलाल जैन, डिक्कीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव दांगी, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे उपस्थित होते. माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...