आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा विळखा:राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाचा लागण, सकाळीच लावली होती मंत्रालयात हजेरी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर तात्काळ वळसे पाटील मंत्रालयातून परतले.

राज्यभरातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांसह राजकारण्यांना कोरोनाने विळखा घातला आहे. आधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पाठोपाठ खासदार सुनील तटकरे आणि आता राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान आज सकाळीच दिलीप वळसे पाटील हे मंत्रालयात हजर राहिले होते. ते कॅबिनेट बैठकीसाठी आज सकाळी मंत्रालयात आले होते. कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर तात्काळ ते मंत्रालयातून परतले. वळसे पाटील यांना सध्या आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

दिलीप वळसे पाटलांनी म्हटले की, 'नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी.'