आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीची कारवाई:अभिनेता डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची कोट्यवधींची संपत्ती केली जप्त; 14,500 कोटींच्या घोटाळ्यांशी संबंध असल्याचा आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डिनो मोरिया हे काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई आहेत.

महाराष्ट्रात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे. याच्यांवर 14,500 कोटींच्या घोटाळ्यांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे डिनो मोरिया हे काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार निर्माण करण्यात पटेल यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई स्टर्लिंग बायोटेक बँकेची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाला या तिघांचे कनेक्शन 14 हजार 500 कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्यातील आरोपी आणि गुजरातमधील व्यापारी संदेसरा बंधुओ यांच्यासोबत मिळाले आहे. त्यासोबतच अहमद पटेल यांचे संदेसरा यांच्यासोबत चांगले संबध असल्याचे तपासातून समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...