आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री दिपाली सय्यद यांनी माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बेछूट आरोप करुन भाऊसाहेब शिंदे यांनी आपली बदनामी केली, असा आरोप दिपाली सय्यद यांनी केला आहे. या तक्रारीची दखल घेत ओशिवरा पोलिसांनी भाऊसाहेब शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप
अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. सय्यद यांची दुबई, लंडनमध्ये मालमत्ता आहे, असा आरोप यापूर्वी पत्रकार परिषद घेत भाऊसाहेब शिंदे यांनी केला होता. त्यावरुनच दिपाली सय्यद यांनी पोलिसांत धाव घेत बदनामीची तक्रार दिली आहे. भाऊसाहेब शिंदे हे सय्यद यांच्या सेवाभावी संस्थेचे कामकाज 2019 पर्यंत पाहत होते. पण सय्यद यांनी शिंदे यांना 2019 मध्ये कामावरुन काढले होते. त्यानंतर भाऊसाहेब शिंदे यांनी दिपाली सय्यद यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.
माझ्यावर अत्यंत चुकीचे आरोप- दिपाली सय्यद
भाऊसाहेब शिंदे यांनी दिपाली सय्यद यांचे पाकिस्तान आणि दुबई कनेक्शन असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांनी सामूदायिक विवाहाच्या नावाखाली अनेक बोगस लग्न लावल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर भाऊसाहेब शिंदे यांच्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया न देता दिपाली सय्यद यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आता याप्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर दिपाली सय्यद यांनीही भाष्य केले आहे. दिपाली सय्यद म्हणाल्या, माझ्यावर आणि माझ्या ट्रस्टवर जे आरोप झाले ते अत्यंत चुकीचे आहेत.
फडणवीसांकडे कारवाईची मागणी
दुसरीकडे, भाऊसाहेब शिंदे यांनीही दिपाली सय्यद यांच्याकडे कारवाई करावी, अशी मागणी उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.