आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाविण्यपूर्ण उपक्रम:लॉकडाउनदरम्यान काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या शांततेला दिग्दर्शक भारत बालाने कॅमेऱ्यात केले कैद

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो मुंबईतील मरिन ड्राइव्हचा आहे. - Divya Marathi
हा फोटो मुंबईतील मरिन ड्राइव्हचा आहे.
  • 4 मिनीटात काश्मीर ते कन्याकुमारीच्या अप्रतिम दृष्यांना बनवण्यासाठी एक कोटींपेक्षा जास्त खर्च आला

विनोद यादव

कोरोना महामारीमुळे देशात घोषित केलेल्या लॉकडाउनमुळे जेव्हा लोक आपल्या घरात एकप्रकारे कैद झाले होते, तेव्हा दिग्दर्शक भारत बालाने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या देशातील लोकप्रिय आणि ऐतिहासिक ठिकाणांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. आता हे फोटोज आणि व्हिडिओ 'उठेंगे हम' नावाच्या एका सिनेमॅटिक डॉक्यूमेंटच्या रुपात आले आहे. 4 मिनीटात काश्मीर ते कन्याकुमारीच्या अप्रतिम दृष्यांना बनवण्यासाठी एक कोटींपेक्षा जास्तीचा खर्च आला आहे.

हा फोटो मुंबईतील जे.एन.पी.टी पोर्टचा आहे.

राज्य सरकारांकडून मिळालेल्या मंजुरीनंतर शूट झाला व्हिडिओ

दिग्दर्शक भारत बालाने सांगितले की, लॉकडाउनचे दृष्य डॉक्यूमेंट करण्याची आयडिया 24 मार्चला मनात आली खरी, पण यासाठी राज्य सरकारांकडून मंजुरी मिळवणे सोपे काम नव्हते. आम्हाला 16 पेक्षा जास्त राज्यातील ठिकाणांचा सिनेमॅटिक डॉक्यूमेंट तयार करायचा होता. आम्ही एका व्हर्चुअल प्रोडक्शनमध्ये बसलो होतो. या क्रिएशनमध्ये प्री-प्रोडक्शन, प्रोडक्शन,शूटिंग, पोस्ट प्रोडक्शनपासून सर्वकाही व्हर्चुअल होते आणि आम्हाला सर्वात आधी मंजुरी उत्तर प्रदेश सरकारने दिली. त्यानंतर कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, काश्मीर आणि आसामसह इतर राज्यांनीही मंजुरी दिली. 

15क्रू आणि 117 लोकांनी मिळून शूट केले

बालाने पुढे सांगितले की, 15 क्रू टीमसोबत व्हर्चुअल शूटिंग करण्यात आली. यात एकूण 117 लोक सामील होते. लॉकडाउनमधील महत्वाचे क्षण जाऊ नयेत, म्हणून एका दिवसात तीन ठिकाणांची शूटींग करण्यात आली. यासाठी मुंबईमध्ये एक मास्टर कंट्रोल रूम बनवण्यात आला. तिथे 24 तास काम करण्यात आले. सध्या आमच्याकडे 100 तासांचे फुटेज मटेरिअल तयार झाले आहे.

हा फोटो मुंबईच्या चर्च गेट स्टेशनचा आहे. लॉकडाउनमुळे लोकट ट्रेन बंद आहेत.

हा फोटो वाराणसीतील एका घाटाचा आहे. 

हा फोटो श्रीनगरमधील हजरतबल मशिदीचा आहे.

बातम्या आणखी आहेत...