आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यस्वामी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहे. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चांगलेच मतभेद असल्याचे ते म्हणाले.
सुब्रमण्यमस्वामी यांनी ट्विट करत शरद पवार आणि अजित पवार यांच्या मतभेदावर बोट ठेवले आहे. ते म्हणाले की, 'राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजितदादा यांच्यात चांगलेच मतभेद आहे. दोघांचेही वेगवेगळे विचार आहे. त्यामुळे या पक्षात अंतर्गत कलह आहे' असा दावाच सुब्रमण्यमस्वामी यांनी केला आहे.
NCP is in an internal crisis with Sharad Pawar & Ajit Pawar having different goals. Niraj Gunde has raised the issue of Supriya Sule Singapore citizenship & companies. CBI team chosen by Director is of high class investigators. Plus Forensic probe in hands of Dr. Sudhir Gupta
— Subramanian Swamy (@Swamy39) August 23, 2020
यासोबतच सुब्रमण्यम स्वामी यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहे. 'निरज गुंडे यांनी सुप्रिया सुळे यांचा सिंगापूर सिटिझनशिप आणि इतर कंपनी व्यवहाराबाबत सीबीआय चौकशी मागणी केली होती', असा मुद्दा त्यांनी आपल्या ट्विट मध्ये उपस्थितीत केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.