आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:नाईक परिवाराशी असलेल्या आर्थिक संबंधांचा खुलासा करा, भाजप नेते सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर अन्वय नाईक परिवार आणि ठाकरे परिवार यांच्यातील आर्थिक संबंधांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सोमय्या म्हणाले, या दोन परिवारांमधील जमीन व्यवहाराचे २१ सातबारा उतारे समोर आले आहेत. गाव कोर्लई, तालुका मुरुड, जिल्हा रायगड येथील अन्वय नाईक, अक्षता नाईक, आज्ञा नाईक यांनी २१ प्लॉट रश्मी उद्धव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांना विकले असल्याचे कागदपत्रांवरून दिसते.

यातील काही जमीन वन, खासगी वने असल्याचे वाटते. या जमिनीस वनेतर वापरास बंदी आहे. वनेतर वापरासाठी केंद्र शासनाची पूर्व परवानगी आवश्यक आहे. या जमीन व्यवहारात रश्मी ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे आहेत. वायकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मंत्रीही होते. मनीषा या वायकरांच्या पत्नी आहेत. रश्मी उद्धव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांचे संबंध आर्थिक आहेत, व्यावसायिक आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे सोमय्या म्हणाले.

रश्मी ठाकरे व मनीषा वायकर यांचा या जमीन घेण्यामागचा उद्देश काय होता? नाईक परिवाराचे उद्धव ठाकरे परिवाराशी घनिष्ठ व्यक्तिगत, आर्थिक की व्यावसायिक संबंध आहेत, याबाबत स्पष्टता व्हायला पाहिजे, असे सोमय्या म्हणाले. तसेच या जमिनी शेती करण्यासाठी घेण्यात आल्या, शेती व्यवसायसाठी, जमीन व्यवसायासाठी की गुंतवणुकीसाठी घेतल्या आहेत. अशा प्रकारचे आणखी किती जमीन व्यवहार ठाकरे परिवाराचे झाले आहेत? तसेच ठाकरे परिवार आणी वायकर परिवार यांचा हा एकच संयुक्तिक जमीन व्यवहार आहे की, असे अनेक गुंतवणुकीचे व्यवहार झाले आहेत, हे पुढे यावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली. दरम्यान, कायदेशीरपणे जमीन खरेदी केली असेल तर त्यात वावगे काय, असा प्रश्न उपसभापती नीलम गोऱ्हेंनी केला.

बातम्या आणखी आहेत...