आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेकडून विधान परिषदेसाठी सुभाष देसाई, सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दरम्यान असे असले तरी, शिवसेना नेते आमशा पाडवी यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, माझ्या एकनिष्ठतेचे फळ मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवला. संजय राऊत यांनी सोमवारी फोन करून मला विधान परिषदेवर निवड करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानुसार आज आपण मुंबईत जाणार असल्याची माहिती पाडवी यांनी दिली.
पवार अन् पाटलांची भेट
राष्ट्रवादीकडूनही विधान परिषदेसाठी एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची काल रात्री उशिरा भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात येत्या 20 जूनला विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होणार आहे. 9 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
मतदान कधी?
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत यांच्यासह 10 जागांवर येत्या 20 जूनला निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. 22 जुलै रोजी या 10 आमदारांची मुदत संपत असल्याने त्यापूर्वी 20 जूनला मतदान होणार आहे.
कोण आहेत आमशा पाडवी?
आमशा पाडवी हे मूळचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेत गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत. शिवसेनेला नंदुरबार जिल्ह्यात उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे. हा अत्यंत दुर्गम भाग आहे. कोणतीही साधने नसतानाही पाडवी यांनी शिवसेना रुजवण्याचे काम केले आहे. ते नंदूरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 मध्ये आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण 2019 च्या निवडणुकीत आमशा पाडवी यांनी 80 हजार 777 मते घेतली होती.
कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम
यांचा संपतोय कार्यकाळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.