आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय:महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा, विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागणार?

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा कडवा विरोध

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष बदलले जाण्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. मात्र यात काहीही तथ्य नाही, इतक्यात पक्षश्रेष्ठी राज्यात काहीही बदल करण्याच्या मानसिकतेत नाहीत, अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले येणार तसेच विधानसभा अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागणार, अशी चर्चा गुरुवारी होती.

मात्र चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा कडवा विरोध राहिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा विरोध असताना पक्षश्रेष्ठी असा निर्णय घेण्याची सुतराम शक्यता नाही, असे काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे. बाळासाहेब थोरात यांच्याकडे विधिमंडळ पक्षनेता, महसूल मंत्री व प्रदेशाध्यक्ष अशी तीन अत्यंत महत्वाची पदे आहेत. त्यास काँग्रेसमधील काहींचा विरोध आहे. त्यातून थोरात यांना हटवण्याच्या बातम्या पेरल्या असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांचा दावा आहे. नाना पटोले यांना दिल्लीत यासंदर्भात विचारले असता, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र प्रदेश काँग्रेसमधील बदलांच्या चर्चा दिल्लीत पक्षीय पातळीवर नाहीत, असे पटोले म्हणाले. माजी खासदार राजीव सातव यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद दिले जाण्याची चर्चा अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान होती.

बातम्या आणखी आहेत...