आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन ओ फ्रेंड:उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांची चर्चा; राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीचा नवा प्रयोग

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात संभाव्य राजकीय युतीसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नवा प्रयोग होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे व आंबेडकर यांच्यात बुधवारी (२ नोव्हेंबर) फोनवर चर्चा झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर २० नोव्हेंबरला प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरील एकाकार्यक्रमानिमित्ताने मुंबईत एकत्र येत आहेत. शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग राज्यात पूर्वी झालेला आहे.

रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले २०१२ पासून शिवसेनेसोबत सोबत होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आठवले सेनेची साथ सोडून भाजपबरोबर गेले. ती पोकळी भरुन काढण्यासाठी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवशक्ती-भिमशक्तीचा प्रयोग पुन्हा होऊ शकतो. प्रकाश आंबेडकरांनी याआधीही ठाकरे गटाच्या शिवसेनेबरोबर युतीचे संकेत दिले आहेत.

आता दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणार आहे. त्यामुळे युतीची शक्यता बळावली आहे. जर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यास राष्ट्रवादीचा विरोध होण्याची शक्यता आहे. शिवाय, काँग्रेसची नाराजी होऊ शकते. अॅड. आंबेडकरांनी अनेकवेळा काँग्रेस-राष्ट्रावादीसमोर युतीचा प्रस्ताव दिला होता. पण, प्रतिसाद मिळाला नसल्याने वंचित आघाडीने गेल्या विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमशी हातमिळवणी केली होती. आता शिवसेनेने वंचितला सोबत घेतले तर मविआचे काय होणार? असा प्रश्न आहे.

आधी आठवलेंसाेबत युती : वंचितला संधी आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप, शिंदे गट, मनसे, रिपाइं अशी महायुती होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाबरोबर वंचित बहुजन आघाडीला युतीची संधी आहे. काँग्रेस पालिकेत स्वतंत्र लढेल. राष्ट्रवादी मात्र सेनेसोबत जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...