आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस नेत्याचा आरोप:राहुल गांधीच्या खच्चीकरणासाठी शरद पवारांना यूपीए प्रमुख बनवण्याची चर्चा : संजय निरुपम

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसलाच संपवण्याचा हा मोठा कट असल्याचा संजय निरुपम यांचा आरोप

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होणार अशी राजकीय चर्चा रंगली होती. यावरून राहुल गांधीच्या खच्चीकरणासाठी ही चर्चा सुरू आहे. काँग्रेसला संपवण्याचा हा मोठा कट असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. संजय निरुपम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून हा आरोप केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

संजय निरुपम यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, ''दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधीं विरोधात अभियान सुरू आहे. शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष बनवण्याची चर्चा त्याचाच भाग आहे. या अभिमानानुसार 23 स्वाक्षऱ्यांचे पत्र लिहिले गेले होते. काँग्रेसलाच संपवण्याचा हा मोठा कट आहे."

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे यूपीए अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याच्या बातम्यांनी कालचा (गुरुवार) दिवस चर्चेत राहिला. महाराष्ट्रात वर्षभरापूर्वी जो करिष्मा शरद पवारांनी केला तोच करिष्मा देशपातळीवर पवारांनी करावा, याचाच भाग म्हणून पवारांकडे यूपीएचे अध्यक्षपद जाणार असल्याच्या बातम्या काल आल्या. मात्र या वृत्तात काही तथ्य नसल्याचे म्हणत शरद पवारांना या चर्चांना पूर्णविराम दिला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser