आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी राणे पिता-पुत्राविरोधात पोलिसांत एक तक्रार दाखल केली होती, त्यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशाची बलात्कार करुन हत्या करण्यात आली असा दावा नारायण राणेंनी केला होता. याप्रकरणी दिशाच्या कुटुंबीयांनी राणेंकडून दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आज राणे पिता-पुत्रांविरोधात मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एक खळबळजनक खुलासा केला होता. नारायण म्हणाले होते की, दिशा सालियनवर बलात्कार करुन तिची हत्या झाली आहे. ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. नारायण राणेंया या वक्तव्यावर सालियन कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत आक्षेप घेतला होता. राणेंमुळे आपल्या मुलीची बदनामी होत आहे, त्यांनी तिची बदनामी करणे थांबवावे, असे आवाहन सालियन कुटुंबीयांनी केले होते. त्यानंतर आता सालियन कुटुंबीयांनी पोलिसांत राणे पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आम्हाला जगू द्या
राज्यात दिशाच्या नावाखाली राजकारण सुरू झाले आहे. दरम्यान दिशाच्या कुटुंबीयांनी राजकारणी मंडळींना आर्तहाक देत म्हटले आहे की, दिशा तर गेली, तिच्या पाठीमागे राजकारण करू नका. आम्हाला सोयीने जगू द्या. अशी आर्तहाक दिशाच्या आई-वडिलांनी केली आहे. नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात खळबळजनक खुलासा केला होता. त्यानंतर आज दिशाच्या कुटुंबीयांनी नारायण राणे आणि नितेश राणे या दोघांविरोधात मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी राज्य महिला आयोगाला सोपवला अहवाल
दिशाचे बलात्कार करण्यात आले असून, ती गरोदर असल्याचा खुलासा नारायण राणे यांनी केला होता. दरम्यान मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाला अहवाल सोपवला आहे. दिवंगत दिशा सालियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. तिच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसून, ती गरोदर सुद्धा नव्हती. हे मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाला दिलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.