आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Disha Salian Suicide Case | Disha Case Mumbai | Marathi News | Thoughts Of Suicide In Our Minds Too, Leaders Are Responsible For It; The Feelings Of Disha Salian's Parents

आम्हाला तरी जगू द्या:आमच्याही मनात आत्महत्येचा विचार, त्यासाठी नेते जबाबदार; दिशा सालियनच्या पालकांची भावना

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा समोर आला आहे. राजकीय मंडळी एकमेकांना आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान या प्रकरणात दिशाच्या घरच्यांना भावनिक साद घातली आहे. दिशा तर गेली, आम्ही त्या दुःखातून सावरण्याचे प्रयत्न करत आहोत. पण काही जण याचे राजकारण करत आहेत. पुन्हा, तेच-तेच आरोप करुन आमच्या मुलीला बदनाम करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला आहे. आम्हाला परेशान करू नका, आम्हाला किमान जगू द्या. अशी भावनिक साद दिशा सालियनची आई वसंती सालियन यांनी घातली आहे. आज राज्य आयोगाच्या दोन सदस्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियन हिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले.

दिशाची आई वसंती सालियन यांनी म्हटले आहे की, महापौर किशोरीताई पेडणेकर आम्हाला भेटायला आल्या. त्यामुळे आम्हाला थोडासा दिलासा मिळाला. दिशाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी पाच वेळा तपास केला. आता आम्ही कुठे त्या दुःखातून सावरत आहोत. मात्र राज्यात तिला पुन्हा बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. हा हक्क त्यांना कुणी दिला. असा सवाल वसंती सालियन यांनी उपस्थित केला आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, आमचे दुःख समजून घ्या. आम्हाला सुखाने जगू द्या. ती जिथे आहे तिथे तिला त्रास होईल असे वागू नका. पुन्हा तेच प्रकरण काढल्याचा त्रास आम्हाला होत आहे. यातून माझ्या जीवाचे काही बरंवाईट झाल्यास त्याची जबाबदारी आरोप करणाऱ्यांवर असेल. असे इशारा देखील वसंती सालियन यांनी दिला आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर या मुद्यावर पुन्हा राजकारण सुरू झाले आहे. सध्या सुरू असलेल्या आरोपांमुळे आम्ही व्यथित झालो असून, आमच्या जीवाचे बरंवाईट झाल्यास नेत्यांना जबाबदार ठरवण्यात यावे असेही दिशा सालियनच्या आई-वडिलांनी म्हटले. माध्यमांशी संवाद साधताना दिशा सालियनच्या आई भावूक झाल्या होत्या.

आम्हाला जगू द्या; पालकांची विनंती

दिशा सालियनच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या आरोपांवरून आम्ही व्यथित झालो आहोत. आम्हाला जगू द्या आणि तुम्हीही जगा असे आर्जव दिशाच्या आई-वडिलांनी केले आहे. आमच्या मुलीची नाहक बदनामी होत असून, हे प्रकार थांबले पाहिजे अशी विनंती दिशा सालियनच्या आई-वडिलांनी केली आहे.

...म्हणून दिशाची आत्महत्या

ऑफिसमधील तणावामुळे दिशाने आत्महत्या केली असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले. व्यावसायिक डील रद्द होत असल्याचे तिने घरी सांगितले होते. त्या तणावात ती होती, असेही पालकांनी सांगितले. आम्ही ज्यांना मतदान करतोय तेच आमच्या मुलीला बदनाम करत आहेत. अशी खंतही दिशा सालियनच्या आईने व्यक्त केली. पोस्टमार्टेम अहवालात तिच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. तरीदेखील तिच्यावर बलात्कार झाला, तिची हत्या झाली असे सांगून बदनामी का करत आहात, असा प्रश्नही दिशाच्या आईंनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...