आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय:आघाडी सरकार बरखास्त करा; पण विधानसभा नको, ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनसुख हिरेन प्रकरण असो वा देशमुख प्रकरण, या दाेन्हींची निष्पक्ष चौकशी राज्य सरकारकडून होणार नाही, त्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करण्यात यावे. मात्र विधानसभा बरखास्त करू नये, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

ॲड. आंबेडकर यांनी सोमवारी दुपारी राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी आंबेडकर म्हणाले, परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपप्रकरणी मुख्यमंत्र्यांना कणा नसल्याचे पुन्हा दिसले आहे. देशमुख प्रकरणात राज्यपालांनी आपला अहवाल राष्ट्रपतींना पाठवावा, अन्यथा राज्यपाल ज्या पक्षाचे आहेत तो पक्षसुद्धा या प्रकरणात सामील असल्याचा जनतेचा समज होईल, असे ते म्हणाले.

वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात विरोधी पक्ष असलेला भाजपा बोटचेपी भूमिका घेत आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली. दरेकर यांनीही राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...