आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे - फडणवीस सरकार बरखास्त करा:हे गुडांचे सरकार आहे?, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे - फडणवीस सरकार बरखास्त करावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे. तर हे गुडांचे सरकार आहे? असा सवालही विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला आहे.

काय म्हणाले दानवे?

अंबादास दानवे म्हणाले की, सदा सरवणकर यांनी दोन ते तीन दिवसांपूर्वी स्वत्:च्या रिल्व्हावर ने गोळीबार केल्याचा आरोप आहे. ते दोषी असून गुन्हेगार असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला आहे. तर अशा माणसाला केंद्रीय मंत्री नारायण राणे येवून भेटतात, आणि माझे मित्र आहेत असे सांगतात आणि मुंबई आणि महाराष्ट्रात तुम्हालाही राहायचे आहे. महाराष्ट्र आणि मुंबई तुम्हाला आंदन दिले आहे का असा सवाल अंबादास दानवेंनी भाजप आणि नारायण राणेंना केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते जर आशा प्रकारची दादागिरीची भाषा करणार असतील तर मग हे महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीसांचे सरकार हे नेमके कुणाचे आहे, हे गुंडाचे सरकार आहे का? असा सवाल अंबादास दानपवेंनी उपस्थित केला आहे. सत्तेवर असणाऱ्या पक्षाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असली पाहिजे की दादागिरी आणि धमक्या देण्याची जबाबदारी आहे, अशी खरपूस टीकाही सरकारवर केली आहे.

अशा पद्धतीने जर दादागिरी आणि धमक्या देत असाल तर शिंदे - फडणवीस सरकारवर कारवाई केली पाहिजे, हे सरकार बरखास्त केले पाहिजे अशी मागणी जनतेसह शिवसेनेकडून करण्यात येत आहे असेही दानवेंनी म्हटले आहे. सत्ताधारी पक्षाकडून अशी दादागिरी महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही असा इशाराही अंबादास दानवेंनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

काय म्हणाले होते राणे?

नारायण राणे म्हणाले, दादरमधील हाणामारी व गोळीबारप्रकरणी पोलिसांकडे दोन्ही गटांनी तक्रारी दिल्या आहेत. यावर आता पोलिस चौकशी करून खर काय घडलं ते सांगतील. पण, सरवणकरांवर गोळीबाराचा आरोप असला तरी घटनेदरम्यान कुणीही गोळीबाराचा आवाज ऐकलेला आहे. मातोश्रीच्या दुकानात बसून आता काही जण केवळ तक्रारी करण्याचे काम करत आहेत. याप्रकरणात तेच झाले आहे.

...तर फिरणेही कठीण

राणे म्हणाले, मुंबईत शिंदे गटाची ताकद आहे की नाही हे काळानुसार कळेल. आताही शिंदे गटाचे ४० आमदार सहज निवडून येऊ शकतात. दादरमध्ये जो धागडधिंगा घालण्यात आला आम्ही त्याची दखल घेत नाही. आम्ही दखल घेतली तर त्यांचे फिरणेही कठीण होईल. त्यांना शेवटी मुंबई, महाराष्ट्रात फिरायचे आहे.

बातम्या आणखी आहेत...