आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासन निर्णय:आयएएस विजयकुमार गौतम यांची हकालपट्टी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलसंपदा विभागात निवृत्तीनंतर नियुक्त करण्यात आलेले १९८७ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी विजयकुमार गौतम यांना अखेर शिंदे-फडणवीस सरकारने नारळ दिला. गौतम यांची कंत्राटी कराराची मुदत संपण्यापूर्वीच त्यांची शुक्रवारी (ता.३०) सेवा संपुष्टात आणण्यात आली. जलसंपदा विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे.

विजयकुमार गौतम हे मे २०२१ मध्ये निवृत्त झाले. निवृत्तीनंतर अवघ्या सहा दिवसांत त्यांची जलसंपदा विभागात नियुक्ती झाली होती. आश्चर्य म्हणजे जलसंपदा विभागाचा फार अनुभव गौतम यांच्या पाठीशी नव्हता तरीही तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या शिफारशीवरून त्यांची वर्षभरासाठी सचिव पद समकक्ष अशी नियुक्ती झाली होती. विभागाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी गौतम यांना मुदतवाढ देण्यात आल्याचा युक्तिवाद त्यावेळी केला होता.

बातम्या आणखी आहेत...