आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Dismissal Of Municipal Officials Satish Magar, Kiran Palve From MNS For Violation Of Party Discipline Action As Per Order Of Raj Thackeray

सतीश मगर, किरण पालवेंची मनसेतून हकालपट्टी:पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याने राज ठाकरेंच्या आदेशानुसार कारवाई

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नगर जिल्ह्यातील पदाधिकारी सतीश मगर आणि आणि किरण पालवे ह्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे असे पत्रच मनसेतर्फे आज जारी झाले आहे.

याबाबत मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांच्या सहीचे पत्रच जारी करण्यात आले आहे. त्यात नगर जिल्ह्यातील पदाधिकारी सतीश मगर आणि आणि किरण पालवे ह्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे असे म्हटले आहे.

राज्यात मनसेला अधिक मजबूत करण्यासाठी अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. विदर्भात मजबूत संघटन उभे करण्यासाठी मनसेकडून जोरदार प्रयत्न होत आहेत. पुणे दौरा, नाशिक दौराही राज ठाकरेंनी केला. राज ठाकरे नागपूरसह, इतर विदर्भातील शहरातही दौैऱ्यावर होते. तेथे त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या आधीच्या नियुक्त्याही रद्द करीत नव्या नियुक्त्या केल्या होत्या. त्यानंतर नगरमध्ये आज मनसेकडून दोन पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

पक्षविरोधी काम केल्यास थेट हकालपट्टी होणार हे आजच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. यापुर्वीही पक्षशिस्ती न पाळणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...