आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:कदम-परब यांच्यातील वाद भाऊबंदकीचा! पक्ष म्हणून शिवसेना दोघांच्या वादात पडणार नाही

मुंबई / अशोक अडसूळ17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिवहनमंत्री व शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांच्या मालमत्तांबाबतची कागदपत्रे शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरवल्याची कथित ध्वनिफीत पुढे आली आहे. मात्र परब आणि कदम यांच्यातील वाद जुन्या भाऊबंदकीचा असून त्यात पक्ष म्हणून शिवसेना मध्ये पडणार नसल्याचे समजते.

रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम हे परब यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. रामदास कदम आणि त्यांचे बंधू सदानंद यांच्यात सख्य नाही. परिणामी, परब आणि कदम यांच्यात शत्रुत्व उद्भवल्याचे सूत्रांनी सांगितले. अनिल परब यांचे दापोली तालुक्यात मुरुड येथे हाॅटेल साई रिसाॅर्ट आहे. त्याचे कामकाज सदानंद कदम पाहतात. त्या रिसाॅर्टप्रकरणी किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत.

कदमांनी आराेप फेटाळले
खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी रामदास कदम आणि किरीट सोमय्या यांच्यातील कथित संभाषणाबाबतची ध्वनिफीत नुकतीच जाहीर केली. मात्र रामदास कदम यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले असून आपल्याला बदनाम केले जात आहे, असा दावा केला आहे. विरोध पक्षातील नाराजांना ओढण्याचा भाजपचा प्रयत्न करते आहे. युती तुटल्यावर भाजपने कोकणावर लक्ष केंद्रित केले आहे.

परब यांना अडचणीत आणल्याने कदमांना शिक्षा होणारॽ
कदम पुत्र योगेश हे दापोलीचे आमदार आहेत. दुसरा पुत्र युवा सेनेत सक्रिय आहे. तर कदम स्वत: विधान परिषदेवर आहेत. कदम यांच्यावर शिवसेना इतक्यात कारवाई करण्याची शक्यता नाही. ते सेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विविध मंत्रिपदे भूषवली आहेत. ते विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई हळुवारपणे केली जाईल, असे समजते. रामदास कदम यांची विधान परिषदेची मुदत १ जानेवारी २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. त्यांचे सदस्यत्व पुढे कायम ठेवले जाणार नाही. परिषद खंडित करून परब यांना अडचणीत आणल्याबाबतची त्यांना शिक्षा केली जाईल, असे बोलले जाते.

बातम्या आणखी आहेत...