आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

41 चित्रपटांना 13 कोटींचे अनुदान वाटप:सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वाटप

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजाला विषारी विचारांपासून वाचविण्याची जबाबदारी चित्रपटसृष्टीची आहे, दर्जेदार आणि आशयघन चित्रपट निर्मितीतून चित्रपटसृष्टीने ती पूर्ण करावी. राज्य शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

बुधवारी मंत्रालयात दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेंतर्गत ४१ मराठी चित्रपटांना १२ कोटी ७१ लाख रुपये अनुदान वाटपाचा कार्यक्रम मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला त्या वेळी ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले, आशयघन मराठी चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. राज्य सरकार चित्रपटांच्या निर्मितीला बळ देण्यासाठी पाठीशी उभे आहे.

बातम्या आणखी आहेत...