आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाथा-बुक्क्यांनी तुडवले VIDEO:दिवा स्टेशनवर 2 प्रवाशांना बेदम मारहाण, लोकलमध्ये गेटवरच उभे राहिल्याने प्लॅटफॉर्मवरील प्रवासी संतापले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई परिसरात लोकलमध्ये होणारी गर्दी व त्यातून होणारे वाद नवीन नाही. दिवा स्टेशनमध्येही अशाच एका वादातून दोन प्रवाशांना इतर प्रवाशांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

नेमके झाले काय?

मिळालेल्या माहितीनुसार, लोकल ट्रेनच्या गेटवर उभे राहून दोन प्रवासी चढण्यात आणि उतरण्यात अडथळे निर्माण करत होते. दिवा स्टेशनमध्ये काही प्रवाशांना यामुळे लोकलमध्ये चढता येत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला बाचाबाची झाली व त्यानंतर स्टेशनवर असलेल्या संतप्त प्रवाशांनी लोकलच्या गेटवर उभे असलेल्या दोघांना खाली खेचले व त्यांना बेदम मारहाण केली. प्रवाशांनी अक्षरश: लाथा-बुक्क्यांनी या दोन प्रवाशांना तुडवले. ही संपूर्ण घटना सोमवारी घडल्याचा दावा केला जात आहे.

गर्दीमुळे नेहमीच वाद

घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सोमवारी संध्याकाळी 7 वाजन 10 मिनिटांनी कर्जत लोकल सुटली. ही लोकल काही वेळेतच दिवा स्टेशनवर दाखल झाली. कर्जतला जाणारी ही लोकल मुंबईतूनच जवळपास भरलेली असते. त्यामुळे ठाण्याला जाणाऱ्या चाकरमान्यांना दिवा स्टेशनमधून या लोकलमध्ये जागाच मिळत नाही. तरीही कसेबसे चढून चाकरमानी प्रवास करतात. कर्जत-खोपोली-कासारा या लांब पल्ल्याच्या गाड्या दिवा स्टेशनवर थांबत असल्यामुळे येथील प्रवाशांची लोकलमध्ये गर्दी होते. त्यामुळे ठाण्याच्या प्रवाशांची गैरसोय होते.

ठाण्यातील प्रवाशांची अडचण

सोमवारी झालेली घटना याच कारणामुळे घडल्याचे सांगितले जात आहे. ठाण्याला जाण्यासाठी काही जणांनी लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. अशात लोकलमध्ये गेटवरच उभे असलेल्या प्रवाशांमुळे लोकलमध्ये चढतानाही दिवा स्टेशनवरील प्रवाशांना अडचण होत होती. यातूनच वाद विकोपाला गेला व संताप अनावर झाल्याने लोकलमधील दोन प्रवाशांना प्लॅटफॉरर्मवर खेचून इतर प्रवाशांनी त्यांना अक्षरश: लाथा-बुक्क्यांनी तुडवले.