आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लता मंगेशकर एक्सक्लूझिव्ह:2019 पासून ना घराबाहेर पडल्या ना कुणाला भेटल्या, डॉक्टरांनी सांगितले- 7 ते 8 दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावे लागेल

राजेश गाबा | मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे डॉक्टरांचे पथक त्याच्यांवर उपचार करत आहे. 92 वर्षीय लता मंगेशकर यांना नोव्हेंबर 2019 मध्ये न्यूमोनिया झाला होता. त्यावेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांना 28 दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, 2019 पासून लताजींनी घर सोडले नाही. कुणालाही भेटल्या नसतानाही त्यांना कोविड कसा झाला. याच्याच तपासाचा दिव्य मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पहा.

लता मंगेशकर यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आल्यापासून सेलेब्ससह चाहते लता मंगेशकर लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

लता मंगेशकर स्टुडिओ आणि म्युझिकचे सीईओ मयुरेश पै यांनी दैनिक भास्करशी केलेल्या खास संवादात सांगितले की, लता दीदींना कोरोनामुळे शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्या आयसीयूमध्ये असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित

दीदी त्यांच्या बहीण उषा मंगेशकर यांच्या कुटुंबासह, तिचा भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांच्या मुलांसोबत पेडर रोड परिसरात राहतात. कुटुंबातील उर्वरित सदस्य सुरक्षित आहेत. मयुरेशने सांगितले की, घरात काम करणारा कर्मचारी सामान घेण्यासाठी बाहेर जातो. त्याला लागण झाली. लता दीदी त्याच्या संपर्कात आल्या होत्या. म्हणूनच लताजींची चाचणी झाली तेव्हा त्या पॉझिटिव्ह आल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्या निरीक्षणाखाली आहेत.

कोरोनासोबतच न्यूमोनियाचाही त्रास- डॉक्टर

ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी सांगितले की, लता मंगेशकर यांना रविवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाचाही त्रास आहे. उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती अद्याप सामान्य नाही. आम्ही त्यांना निरीक्षणाखाली ठेवले आहे. 7 ते 8 दिवसात दिसेल.

बातम्या आणखी आहेत...