आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार
आज शुक्रवार 6 जानेवारी असून, पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी
पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी....
श्रीलंकेचा भारतावर 16 धावांनी विजय
भारत-श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा 16 धावांनी पराभव केलाय. गुरुवारी पुण्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात 207 धावांच्या लक्ष्य गाठण्यास भारतीय संघ अपयशी ठरला. श्रीलंकेच्या या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी एक अशी बरोबरी झाली आहे. आता तिसरा आणि निर्णायक सामना 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जणार आहे. वाचा सविस्तर
1 जानेवारी 2024 रोजी होणार श्रीराम मंदिर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अयोध्येत राम मंदिर उभारणीची तारीख जाहीर केली.1 जानेवारी 2024 पर्यंत राममंदिर तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहा हे काल त्रिपुरा दौऱ्यावर होते. यावेळी भाजपकडून जनविश्वास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमित शहा यांनी ही घोषणा केलीये.
सम्मेद शिखरवर होणार नाही इको टुरिझम
केंद्र सरकारकडून जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र सम्मेद शिखर येथे सर्व पर्यटन आणि इको-टूरिझमवर बंदी घालण्याचे निर्देश जारी करण्यात आलेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी ही माहिती दिली. सम्मेद शिखरला 'पर्यटनस्थळ' म्हणून घोषित केल्यांनतर जैनबांधवांकडून याच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. वाचा सविस्तर
4 हजार घरांच्या पाडकामाला SCची स्थगिती
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी हल्दवानीतील रेल्वेच्या भूखंडावरील 50 हजार नागरिकांनी केलेले अतिक्रमण हटवण्याच्या उत्तराखंड हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली. 7 दिवसांत 50 हजार लोकांचे घर पाडता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय.
उत्तराखंडच्या नैनिताल उच्च न्यायालयाने हल्दवानीतील रेल्वेच्या 29 एकर जमिनीवरील अतिक्रमण पाडण्याचे आदेश दिलेत. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. दरम्यान, हजारो नागरिक या आदेशाच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. या निर्णयामुळे 50 हजारांहून अधिक नागरिकांच्या डोक्यावरील छत हिरावले जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने या कुटुंबांना दिलासा मिळालाय. वाचा सविस्तर
अंजली प्रकरणात 5 नव्हे 7 आरोपी
दिल्लीतील हिट अँड रनप्रकरणाला आता नवीन वळण मिळले आहे. याप्रकरणी ५ नव्हे तर आरोपी असल्याचे समजतंय. आता इतर दोन आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. तसेच आरोपी आणि मृत तरुणीची जुनी ओळख नव्हती असेही तपासातून समोर आले आहे. दरम्यान, पाच आरोपींची कोठडी संपल्यावर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना आणखी 4 दिवसांची कोठडी सुनावलीये. वाचा सविस्तर
आता पाहुयात आज दिवसभरात कशावर आपली नजर असणार ते..
मुख्यामंत्री एकनाथ शिंदे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात आज सुकेश-जॅकलिनवर आरोप निश्चित होणार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.