आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प झाला सादर
पंचामृत ध्येयावर आधारित एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. त्यात शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा सन्मान निधी, शिक्षण सेवकांच्या मानधनात सरासरी दहा हजार रुपयांची वाढ, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा पाच लाख, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, महिलांना अर्ध्या तिकिटांत एसटीचा प्रवास आणि राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार अशा घोषणांची आतिषबाजी केली. महाराष्ट्रात येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका आहेत. हे पाहता देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा षटकार ठोकला आहे. वाचा सविस्तर
अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा!, विरोधकांची टीका
काल सादर झालेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकलपवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरले..फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प म्हणजे 'गाजर हलवा', अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तर वास्तवाचा भान नसलेला अर्थसंकल्प असून हा केवळ चुनावी जुमला आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. वाचा सविस्तर
अभिनेता सतीश कौशिक पंचतत्वात विलीन
अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे काल दिल्लीत निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.. त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले... दरम्यान कौशिक यांचे मित्र अभिनेते अनुपम खेर यांनी सांगितले की, सतीश दिल्लीत मित्राच्या घरी होते. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी चालकाला रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र वाटेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचे निधन झाले. वाचा सविस्तर
उत्तराखंडमध्ये पहिले इलेक्ट्रिक तीर्थक्षेत्र कॉरिडॉर
उत्तराखंडमध्ये २२ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. सुमारे ९०० किलोमीटर लांबीच्या चारधाम यात्रा मार्गावर देशातील पहिला विद्युत तीर्थक्षेत्र कॉरिडॉर बनवला जात आहे. खासगी इलेक्ट्रिक वाहनांसाठी दर ३० किलाेमीटरवर चार्जिंग पॉइंट बनवले जात आहेत. इलेक्ट्रिक तीर्थक्षेत्र कॉरिडॉरचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. वाचा सविस्तर
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दिवशी 4 बाद 255 धावा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात चार गड्यांच्या मोबदल्यात 255 धावा केल्या होत्या.. गुरुवारी दिवसाचा खेळ संपल्यानंतर, सलामीवीर उस्मान ख्वाजाने 14 वे कसोटी शतक झळकावले, तर कॅमेरून ग्रीन देखील 49 धावांवर नाबाद परतला. दरम्यान, सामन्याला दोन्ही देशांच्या पंतप्रधांनी हजेरी लावली होती..
आता पाहुयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणार आहे....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.