आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार,
आज रविवार ८ जानेवारी असून, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी..... पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी....
ठाकरे-शिंदे-फडणवीस एका व्यासपीठावर येण्याची शक्यता
23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यानिमित्ताने विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यामंत्र्यांची कार्यक्रमाला उपस्थिती असेल.तसेच उद्धव यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येणार आहे. ठाकरेंनी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले तर तिघे नेते एकत्रित दिसतील. वाचा सविस्तर
7 व्या मजल्यावर आग, मुलगी जिवंत जळाली
अहमदाबादच्या शाहीबाग भागातील एका 11 मजली इमारतीच्या 7व्या मजल्यावर शनिवारी भीषण आग लागली. या अपघातात एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. बाल्कनीमध्ये हि मुलगी सुमारे 25 मिनिटं वाचविण्यासाठी लोकांकडे विणवणी करित होती. मात्र तिला वाचवण्यात यश आले नाही. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. वाचा सविस्तर
भारताचा मालिका विजय, सूर्यकुमारची दमदार खेळी
टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात 91 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. भारताने दिलेल्या २२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका संघाला 137 धावाच करता आल्या. तर या सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादवनेनाबाद 112 धावा केल्या तर अर्शदीप सिंहने 3, उमरान मलिक, हार्दिक पांड्या, चहल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. वाचा सविस्तर
राज्यात 22 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता
सहा महिन्यांपूर्वी सत्तारूढ झालेल्या शिंदे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार ‘तांत्रिक’ अडचणींमुळे लांबला आहे. मात्र 15 जानेवारीपर्यंत या अडचणी दूर होतील व 20 ते 22 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी शनिवारी दिली. शिंदेसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनीही विस्ताराच्या चर्चेला पुष्टी दिली.राज्यात एकूण 42 मंत्र्यांची नेमणूक करता येते. पण सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह 20 मंत्री आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, 22 रिक्त जागा एकदाच भरल्या जातील. पण भाजप, शिंदेसेना व समर्थक अपक्षांमध्ये मोठी स्पर्धा आहे. त्यांची नाराजी टाळण्यासाठी दोन-चार जागा रिक्त ठेवून त्या आधारे नाराजांना पुढच्या विस्ताराचे गाजर दाखवलेही जाऊ शकते. वाचा सविस्तर
CM धामी यांनी जोशीमठला दिली भेट
उत्तराखंडच्या जोशी मठ भागात जमीन खचली जात आहे. त्यामुळे 561 घरांना तडे गेले आहेत. धक्कादायक म्हणजे भीतीने कडाक्याच्या थंडीत देखील लोकांना घराबाहेर राहावे लागत आहे. घर कधीही कोसळण्याची भीती त्या लोकांना लागली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी काल जोशीमठला भेट दिली. यावेळी लोकांनी त्यांच्यापुढे वेदना मांडल्या. यानंतर धामी यांनी या बिकट परिस्थिती सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन लोकांना दिले.तसेच 55 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. वाचा सविस्तर
देवेंद्रजींना गाणे आवडले, पण ते ट्रोलिंगला घाबरले
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे मूड बनालेया हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रत्येक लग्नात वाजवले जाईल, असा विश्वास अमृता फडणवीस यांनी गाण्याच्या लॉन्च सोहळ्यादरम्यान व्यक्त केला.तसेच देवेंद्र फडणवीस यांनाही गाणे आवडले मात्र ते ट्रोलिंगला घाबरले, असेही अमृता फडणवीस यांनी सांगितले. वाचा सविस्तर
आता पाहुयात आज दिवसभरात कशावर आपली नजर असणार ते..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.