आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार,
दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपलं स्वागत. आज मंगळवार ७ फेब्रुवारी असून माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी.
4 देशांमध्ये भूकंप, 2500 ठार, 8 हजारांवर जखमी
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी तीन शक्तिशाली भूकंपामध्ये २,५०० पेक्षा अधिक लोक ठार झाले व सुमारे ८ हजार लोक जखमी झाले. भूकंपाचा पहिला धक्का पहाटे ४.१७ वाजता ७.८ इतक्या तीव्रतेचा होता. दुसरा दुपारी १२ वाजता ७.५ आणि तिसरा ४ वाजता ६ तीव्रतेचा होता. भूकंपाचे केंद्र सीरियापासून ९० किमी दूर असलेले तुर्कस्तानचे शहर गाझियांटेप होते. तुर्कस्तानात १,६९८ व सीरियात ८०२ लोकांचा मृत्यू झाला. लेबनाॅन व इस्रायलमध्येही धक्के जाणवले.
८४ वर्षांनंतर पुन्हा एकदा एवढी मोठी भयंकर आपत्ती ओढावल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर
हजचे अर्ज माेफत, 25 शहरांतून विमानसेवा
हजसाठी यंदा देशातील २५ शहरांतून रवाना हाेता येईल. पहिल्यांदाच हजचे अर्ज माेफत मिळणार आहेत. आधी त्याचे शुल्क ३०० रुपये हाेते. हजसाठी महिला, वयस्कर, दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल. ४५ वर्षांहून जास्त वयाच्या महिलेने नात्याने जवळच्या पुरुषाविना अर्ज केल्यास त्यांनाही परवानगी दिली जाईल. यंदा भारतातून १.७५ लाख लाेक हज यात्रेला जातील. नवीन हज धाेरणानुसार पहिल्यांदाच पॅकेजमध्ये प्रति हज यात्रेकरू ५० हजार रुपये कमी केले. वाचा सविस्तर
उत्तराखंडमध्ये कमी बर्फवृष्टीमुळे विंटर गेम्स रद्द
उत्तराखंडमध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा दुष्परिणाम आता दिसत आहेत. स्नो लाइन ५० मीटर मागे सरकल्याने हवामान बदलाची नोंद शास्त्रज्ञांनी घेतली होती. आता हिमवर्षाचा पॅटर्नही बदलत आहे. याच्या परिणामामुळे गेल्या एका दशकात उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी घटली आहे. यामुळे चमोली जिल्ह्यातील औलीत २३ ते २६ फेब्रुवारीपर्यंत आयोजित विंटर गेम्स केल्या आहेत. स्पर्धा रद्द होण्याची ही एका दशकातील तिसरी वेळ आहे. वाचा सविस्तर
भारत vs ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका गुरुवारपासून
गुरुवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी कसाेटी मालिकेला सुरुवात हाेत आहे. यादरम्यान सलामीची कसाेटी नागपूरच्या व्हीसीए मैदानावर रंगणार आहे. याच मालिकेसाठी सध्या दाेन्ही संघ कसून सराव करत आहेत. या मालिकेदरम्यान फिरकीपटूंची भुमिका ही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे फिरकीचे वारेच मालिकेच्या विजयाची दिशा निश्चित करताना दिसणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान भारतात सामना जिंकणेच अधिक जिकिरीचे असल्याची प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार स्मिथने दिली. वाचा सविस्तर
काँग्रेसचा अंतर्गत वाद शिगेला, होणार वादळी चर्चा
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सत्यजित तांबे यांना उमेदवारी नाकारल्यावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सत्यजित तांबे प्रकरणात पटोलेंविरोधात ‘लेटर बॉम्ब’ टाकणाऱ्या थोरात यांचे विधिमंडळ नेतेपद धोक्यात आले असून यासाठी 13 फेब्रुवारीला वादळी चर्चा होणार आहे. या संदर्भात आता पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील मुंबईत येऊन नेत्यांकडून आढावा घेणार आहेत. वाचा सविस्तर
आता पाहुयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणारे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.