आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी पॅकेज:शिधापत्रिकाधारकांची दिवाळी; 240 चा शिधा 100 रुपयांतच, राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना होणार फायदा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीनिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रति १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. चालू दरानुसार पामतेल प्रतिलिटर ९०-१०० रु, चणाडाळ ६० रु. किलो, साखर ४० रु. किलो तर रवा ४० रु. किलो आहे. त्यामुळे बाजारभावाप्रमाणे प्रतिव्यक्तीस २४० रुपयांत मिळणाऱ्या या वस्तू केवळ १०० रुपयांत मिळणार आहेत. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या ५१३ कोटी २४ लाख खर्चासही मान्यता दिली. शिधावस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा, तसेच या संदर्भात कुठलीही तक्रार येऊ नये,अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांना घरबांधणीसाठी कर्ज पोलिस अधिकारी व अंमलदारांना बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. १० एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील पोलिसांना खासगी बँकांकडून कर्ज घेऊन पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळामार्फत योजना राबवण्यात येत होती.

बातम्या आणखी आहेत...