आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजीर:किंगमेकर डीके शिवकुमारांचा करिश्मा; महाराष्ट्रात विलासरावांचे सरकार होते वाचवले, पटेलांची खासदारकी ते कर्नाटकात जादू!

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या देशभरात सुरू असलेल्या विजयी घौडदोडीला कर्नाटकात लगाम घालणाऱ्या डी. के. शिवकुमारांची ख्याती किंगमेकर म्हणूनच आहे. त्यांनी 2002 मध्ये महाराष्ट्रात विलासराव देशमुखांचे सरकार वाचवायला मदत केली.

गुजरातमध्ये 2017 च्या निवडणुकीत त्यांच्याच बळाच्या जोरावर अहमद पटेलांनी खासदारकी जिंकली. तर 2018 मध्ये कर्नाटकात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार आणण्यासाठी त्यांनीच कंबर कसली होती. जाणून घेऊ शिवकमारांची ही कर्तबगारी. काँग्रेसच्या विजयी धुळवडीनिमित्त.

विलासरावांचे पाठिराखे...

महाराष्ट्राच्या राजकारणातला तो 2002 चा काळ. आपल्या वक्तृत्वाने उभ्या राज्याला मोहिनी घालणाऱ्या हसतमुख विलासराव देशमुखांच्या सरकारला अविश्वास ठरावाचा सामना करावा लागलेला. तेव्हा शिवकुमार आणि विलासराव देशमुख यांच्यात चांगलेच सख्य होते. या सरकारला कसलाही धोका नको म्हणून त्यांनीच महाराष्ट्रातल्या आमदारांना बंगळुरूत नेले. मतदानाच्या तारखेपर्यंत जवळपास एक आठवडा त्यांनी एका रिसॉर्टमध्ये त्यांची बडदास्त ठेवली. त्यांच्या या खेळीमुळे तेव्हा आमदार तर फुटले नाहीत, शिवाय सरकारही वाचले.

गुजरात ते कर्नाटक

डी. के. शिवकुमार यांनी 2017 च्या राज्यसभा निवडणुकीत गुजरात काँग्रेसचे 42 आमदारही बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये हलवले. त्यामुळे हे आमदारही फुटले नाहीत. याच्याच बळावर अहमद पटेल यांनी निवडणुकीत बाजी मारली. पुढे 2018 च्या निवडणुकीनंतर कर्नाटकात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका निभावली.

महसूल मंत्र्यांना धूळ

सध्याही डी. के. शिवकुमार कनकपुरातून रिंगणात होते. या ठिकाणी त्यांनी भाजप सरकारमध्ये महसूल मंत्री असलेल्या आर. अशोक यांना धूळ चारली. ते सलग आठवड्यांदा विजयी झालेत. विशेष म्हणजे ते सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत. मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिजेल जाते.

श्रीमंत राजकारणी ओळख

सोनिया आणि राहुल गांधी यांच्या जवळचे. श्रीमंत राजकारणी, ही शिवकुमार यांची ओळख. त्यांची 2018 च्या निवडणुकीवेळी 840 कोटींची संपत्ती होती. तर सध्याच्या निवडणुकीत त्यांची संपत्ती 1400 कोटीपर्यंत गेली होती. संकटकाळी ते नेहमी काँग्रेसच्या पाठिमागे उभे राहिले. पक्षाला आर्थिक रसद पुरवली. ईडी, प्राप्तिकर, सीबीआय या चौकशीच्या फेऱ्यातही अडकले. कर्नाटक निवडणुकीपूर्वी 104 दिवस त्यांनी तुरुंगात घातले. तेव्हा सोनिया गांधी यांनी त्यांची तुरुंगात जात विचारपूस केली. हाच प्रसंग आज माध्यमांसमोर सांगताना शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले.

संबंधित वृत्तः

शिवकुमार म्हणाले - भाजपसाठी कर्नाटक क्लोझ, मोदी फेल:हिजाब-हलाल इथे चालणार नाही, आम्ही प्राऊड कानडी, बाहेरचे लोक नकोत

राहुल गांधींनी मानले मतदारांचे आभार; म्हणाले - जनतेच्या शक्तीने भांडवलशाही ताकदींचा पराभव केला, द्वेषाचा बाजार उठला​​​​​​​