आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे वळण:जंगलातून जप्त हाडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांशी जुळला ; सरकारी वकील नेमण्यास मान्यता

मुंबई, नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी नवी दिल्ली पोलिसांना गुरुवारी मोठे यश मिळाले असून महरौली व गुरुग्रामच्या जंगलात आढळलेल्या हाडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांशी जुळला आहे. यामुळे ही हाडे श्रद्धाचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार आहे.

आफताब पूनावाला याने १८ मे रोजी मूळ मुंबईच्या श्रद्धा वालकरची हत्या केली होती. दोघेही गेले अनेक वर्ष लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केले होते. तसेच हे तुकडे ठेवण्यासाठी त्याने ३०० लीटरचा मोठा फ्रिज खरेदी केला होता. तो सलग १८ दिवस मध्यरात्री २ च्या सुमारास मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी जंगलात जात होता. दरम्यान, दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के सक्सेना यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील नियुक्तीस मंजुरी दिली.

श्रद्धा वालकर हत्येच्या पार्श्वभूमीवर सरकारने बनवली समिती प्रतिनिधी | मुंबई राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत मोठा गवगवा करत राज्यात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीची घोषणा करण्यात आली होती. या समितीला झालेला प्रचंड विरोध लक्षात घेता या निर्णयात बदल करण्याची वेळ शिंदे फडणवीस सरकारवर आली असून अवघ्या दोन दिवसांत आली. नव्या निर्णयानुसार राज्य सरकारची ही समिती आता फक्त आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांच्या समन्वय साधणार असल्याचे गुरुवारी (१५ डिसेंबर) जाहीर करण्यात आले आहे.

श्रद्धा वालकर हत्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह समन्वय समितीची घोषणा महिला व बाल कल्याण विभागामार्फत करण्यात आली होती. या समन्वय समितीच्या घोषणेनंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याप्रकरणी विरोधकांचा वाढता विरोध लक्षात घेता या निर्णयात बदल करण्याची वेळ शिंदे फडणवीस सरकारवर आली. नव्या निर्णयानुसार ही समिती आता फक्त आंतरधर्मीय विवाहापुरता मर्यादित असणार आहे. यातून आंतरजातीय विवाहांना वगळण्यात आले आहे. त्याशिवाय आंतरधर्मिय विवाह केलेल्या मुली, महिलांना काही तक्रार असल्यास त्यांच्यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही समिती हेल्पलाईन क्रमांकावर प्राप्त झालेल्या तक्रारींची तपासणी करुन त्यानुसार पुढील कारवाई करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभाग आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देते, अशा जोडप्यांना सरकारतर्फे बक्षीस देण्यात येते. असे असताना या समितीत आंतरजातीय शब्द टाकण्यात आल्याने प्रशासन साफ तोंडावर पडले.

नांदेडच्या देशपांडे यांचा राजीनामा राज्य सरकारने ही समिती जाहीर करताना नांदेडचे अॅड. योगेश देशपांडे यांना स्थान दिले होते. मात्र देशपांडे यांनी अवघ्या काही तासांतच व्यक्तिगत कारणांमुळे या समितीचा राजीनामा दिला. हा राजीनामा स्वीकारत त्यांच्याऐवजी मुंबईचे इरफान अली पीरजादे यांचा समावेश करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...