आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान परिषद निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून, कोकण शिक्षक मतदार संघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बाजी मारली आहे. या निकालाची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही.
विधान परिषदेच्या पाच जागांची मतमोजणी आज पार पडते आहे. पैकी चार जागांचे निकाल येण्याची अजून प्रतीक्षा आहे. या ठिकाणी महाविकास आघाडी विजयी होणार की, भाजप बाजी मारणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
अशी झाली लढत...
कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये 8 उमेदवार रिंगणात होते. मात्र, येथे खरी लढत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांच्यात झाली. पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. येथे म्हात्रे यांनी बाजी मारली. इतर उमेदवारांमध्ये धनाजी नानासाहेब पाटील, जनता दल (युनायटेड ), उस्मान इब्राहिम रोहेकर (अपक्ष), तुषार वसंतराव भालेराव (अपक्ष), देवरुखकर रमेश नामदेव (अपक्ष), प्रा.सोनवणे राजेश संभाजी (अपक्ष), संतोष मोतीराम डामसे रिंगणात होते.
विश्वास सार्थ ठरवला
विजयी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले की, आपल्या कार्यकाळात शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न सोडवणार आहे. हा विजय माझ्या एकट्याचा नसून संपूर्ण शिक्षकांचा आहे. गेल्या सहा वर्षांत काम केले त्याचा आहे. तब्बल 33 संघटनांचा मला पाठिंबा होता. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, रवींद्र चव्हाण, उदय सामंत, दीपक केसरकर यांनी मेहनत घेतली. या सर्वांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.
वीस हजारांच्या पुढे...
म्हात्रे म्हणाले की, वीस हजारांच्या पुढे मला मते पडली आहेत. शिक्षकांची कामे झाले नव्हती, असा आरोप होता. साडेआठ हजार शिक्षक मतदारांची काम मी स्वतः केली आहेत. आताही शिक्षकांसाठी चांगले काम करण्याचे आश्वासन देतो. शिक्षकांच्या पेन्शनचा प्रशन सोडवणार, असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
त्यांना जीव लावला...
शिक्षकांनी केलेले काम, संघटनांनी केलेले काम. माझ्यासाठी महत्त्वाचे ठरले. विजयी करू म्हणून ते पाठिशी होते. बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आठवले गट, भाजप या तिघांचा उमेदवार होतो. मी पहिल्यांदा कोकणात शिक्षक सेना तयार केली होती. त्यांना जीव लावला होता. त्यांची काम केली होती, त्याचे फळ मिळावल्याचे म्हात्रे म्हणाले.
आता काय केले...
ठाकरेंच्या शिवसेनेने 2017 ला काय केले होते. आता काय केले होते. त्यांना विचारा. मी त्यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांनी 'मविआ'च्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला होता. आता या सर्वांची मदत घेऊन विजयी झाल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.