आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेला असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून या वादात आणखी तेल ओतले आहे. सीमाप्रश्नी समन्वयक असलेले मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई ६ डिसेंबरला बेळगावला भेट देणार आहेत. या मंत्र्यांना कर्नाटकात पाठवू नये, असे पत्र बोम्मई यांनी पाठवले आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ४३ गावांवर महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांनी हक्क सांगितलेला आहे. या गावांसाठी पाणी सोडून मुख्यमंत्री बोम्मई यांनी या सर्व गावांवर हक्क सांगितल्याने हा सीमावाद अधिकच तापला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील व देसाई बेळगावला जात आहेत.
४३ गावांच्या पाणी योजना मार्गी लावण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश मुंबई | कर्नाटक सीमेवरील जत (जि. सांगली) तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांसाठी विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना युद्धपातळीवर पूर्ण करा. तसेच येथील गावागावातील पाणीपुरवठा योजनांसाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करावे, यासाठी पुरेसा निधी मिळेल, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिले. जतच्या या ४३ गावांनी पाणी तसेच इतर सोयीसुविधा निळत नसल्याने कर्नाटक राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी या गावांच्या इच्छेचे स्वागत करून या भागासाठी पाणी सोडले होते. त्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले.
जत तालुक्यातील उपसा सिंचन योजनांना गती द्या { या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना आणि गावा-गावांतील पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्या. { विस्तारित उपसा सिंचन योजनेसाठीची सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन प्रत्यक्ष कामे सुरू करा. { या गावांसाठीच्या पाणी योजनांसाठी उद्भव स्रोत असणाऱ्या तलावांमध्ये वेळेत पाणी सोडा. { आरोग्य सुविधांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण आणि तेथील पदभरती, शिक्षकांची पदभरती, शाळांसाठी आवश्यक निधीसाठीची तरतूद.
महाराष्ट्र सरकारने जलसमाधी घ्यावी : संजय राऊत नाशिक : सीमाप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री तुम्हाला डिवचत आहेत. तोंडावर थुंकत आहेत. मात्र कर्नाटकाने सोडलेल्या पाण्यात महाराष्ट्र सरकारने जलसमाधी घेतल्याचे दुर्दैवी चित्र आहे. स्वाभिमानाच्या मुद्द्यावर शिंदे गटाने शिवसेना सोडली. यांच्या क्रांतीची आता वांती झाली आहे का, असा सवाल खा. संजय राऊत यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.