आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंना तूर्त दिलासा:न्यायनिवाडा होईपर्यंत पक्षचिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नका, निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाताखाली सुनावणी झाली. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टाने तूर्तास दिला आहे. कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्णय येईपर्यंत पक्षाच्या चिन्हासंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश​ दिले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालायातील याचिकांवर निर्णय येईपर्यंत शिवसेनेकडेच धनुष्यबाण राहणार आहे.

ठाकरेंची ही होती याचिका

शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत एक कॅव्हेट दाखल केले. यामध्ये त्यांनी ‘आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये,’ अशी मागणी केली होती.

म्हणून केली याचिका दाखल

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ तब्बल 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले. या सर्व घडामोडीनंतर आम्हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाने केला होता. आगामी काळात शिंदे गटाकडून शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरदेखील दावा केला जाऊ शकतो. हे पाहता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल केले.

सुप्रीम दिलासा

आज कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्णय येईपर्यंत पक्षाच्या चिन्हासंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नका असे आदेश​ दिले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालायातील याचिकांवर निर्णय येईपर्यंत शिवसेनेकडेच धनुष्यबाण राहणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा दिला मानला जात आहे.

ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, देवदत्त कामत, तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी, मुकुल रोहीतगी सारखे दिग्गज विधीज्ञ युक्तिवाद करत आहेत. तर अरविंद दातार हे निवडणूक आयोगाची बाजू मांडत आहेत.

बातम्या आणखी आहेत...