आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला सांगू नका, मुंबई महापालिकेच्या चाचणी केंद्रांना सूचना

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. विरोधकांनी सरकारवर मृतांचा आकडा लपवल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आज मुंबई महापालिकेने पॉझिटिव्ह रुग्णांचा रिपोर्ट त्यांना न सांगण्याच्या अजब सूचना चाचणी केंद्रांना दिल्या आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असून, मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यातच आता मुंबई महापालिकेने या अजब सूचना दिल्यामुळे मनसेने नाराजी व्यक्त केली आहे. मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई म्हणाले की, 'कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळणे रुग्णाचा हक्क आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट त्याला न सांगता लॅबमधून थेट मुंबई महापालिकेकडे गेला, दोन दिवस महापालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नाही, या दरम्यान रुग्णाची प्रकृती गंभीर झाली तर त्याची जबाबादारी मुंबई महापालिका घेणार का?'

'मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी काढलेला नवा आदेश अत्यंत चुकीचा आहे. या आदेशानुसार, रुग्णाने कोणत्याही लॅबमध्ये कोरोना टेस्ट केली, तर या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर रुग्णाला त्याबाबत माहिती न देता थेट मुंबई महापालिकेला माहिती देण्यात येईल. त्यानंतर महापालिका प्रशासन उपाययोजना करेल. पण कुठल्याही रुग्णाला आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की नेगेटिव्ह आला, हे कळण्याचा अधिकार आहे, असेही सरदेसाई म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...