आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला 'पेंग्विन सेना' म्हणायचे का?:'कमळाबाई' टीकेवरून शेलारांचं ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले - कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडेही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. हे पत्र त्यांनी ट्विट केले. कमळाबाई या उद्धव ठाकरेंच्या टीकेला आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आमच्या कमळाला हिणवायाल बाई म्हणता. मग तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला आम्ही आता "पेंग्विन सेना " म्हणायचे का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

काय म्हटलं पत्रात?
आपण आमच्या कमळाला हिणवायला "बाई" म्हणताय ? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता "पेंग्विन सेना " म्हणायचे का? असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत! कृपया,हे लक्षात असू द्या!

आशिष शेलार यांचे ट्विट
आशिष शेलार यांचे ट्विट

काय म्हटले शिवसेनेने?

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात भाजपचा उल्लेख कमळाबाई असा केला आहे. झारखंड, दिल्लीमध्ये ‘ऑपरेशन लोटस’चा प्रयत्न फसल्यानंतर भाजप अर्थात कमळाबाईची वाईट नजर आता कॉँग्रेसवर पडली आहे. पक्षांतर्गत नाराजीचा फायदा घेत महाराष्ट्रात कॉँग्रेसमध्ये फूट पाडण्याची ‘हात’घाई भाजपकडून सुरू आहे, असे सामनात म्हटले आहे. यावरुनच भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

बाळासाहेब आणि कमळाबाई

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे भाजपला भाजप न म्हणता कमळाबाई म्हणायचे. ही कमळाबाई राहते आमच्या पक्षात पण हीचे लक्ष दुसर्‍या पक्षाकडे असते, असे बाळासाहेब एका भाषणता म्हणाले होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा भाजप-शिवसेनेने एकमेकांची साथ सोडली. तेव्हा 'कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या', असे बाळासाहेब म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...