आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील निवासी डॉक्टरांचा दुसऱ्या दिवशी संप सुरुच:आरोग्यसेवा कोलमडल्याने रुग्णांचे हाल; 6 हजार डॉक्टर आंदोलनात सहभागी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. हिवाळी अधिवेशनात मागण्यामान्य न झाल्याने डॉक्टरांनी संपाचा हत्यार उगारले, कालपासून सुरू असलेल्या निवासी डॉक्टरांच्या संपामुळे राज्यातली आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. मात्र मुंबईतील 2 हजार डॉक्टरांसह राज्यभरातील 6 हजार डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ओपीडी आणि ऑपरेशन्सवर मोठा परिणाम झाला आहे.

अतिआवश्यक सेवा सुरू

सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. मात्र इमर्जन्सी सेवा देत आहेत. प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक,आंतरवासिता डॉक्टरांना ओपीडी व वार्डामध्ये सेवा देण्यासाठी तैनात आहेत. रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन खैराटकर, यांनी सांगितले.

ओपीडी विस्कळीत होणार

सिव्हिलमध्ये ऑनकॉल डॉक्टर 24 तास सेवा देतात. दुसऱ्या दिवसी त्याच ठिकाणी दुसरे डॉक्टर सेवा देतील. मात्र ओपीडी व वार्डातील सेवा विस्कळीत होणार आहे.

या आहेत मागण्या

राज्यातील सर्व शासकीय किंवा पालिका महाविद्यालयात अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432 जागांची पदनिर्मितीचा प्रस्ताव शासन दरबारी रखडत पडला आहे. यामुळे निवासी डॉक्टरांचे भविष्य ताटकळत आहे.

बंदपत्रीत सेवेचे थोतांड तरी कशाला? सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरावीत. यामुळे निवासी डॉक्टरांचे व पदवी पूर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कधी थांबणार? 16 ऑक्टोबर 2018 प्रमाणे लागू झालेल्या तारखेपासून महागाई भत्ता तत्काळ आदा करण्यात यावा.

बातम्या आणखी आहेत...