आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचा आरोप:मुंबई महापालिकेच्या बीकेसी जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये नियुक्त केलेले डॉक्टर दुसऱ्या रुग्णालयात नोकरी करतात

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीकेसी जम्बो कोविड सेंटरमध्ये अनुभवी डॉक्टर नसल्याचा देखील आरोप

मुंबई महानगरपालिकेने सूरू केलेल्या बीकेसी येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये नियुक्त केलेल्या डॉक्टर हे दुसऱ्या रूग्णालयात नोकरी करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने बीकेसी कोव्हीड सेंटरचे डीन राजेश ढेरे यांची भेट घेतली आणि अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केले.

मुंबईत कोरोना रूग्णांची सतत वाढणारी संख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने बीकेसी येथे जम्बो कोविड सेंटर उभारले होते या कोल्ड सेंटरची जबाबदारी ही डॉ राजेश डेरे यांच्याकडे देण्यात आली आहे. बीकेसी कोव्हीड सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा आणि अनुभव नसणारे कर्मचारी आहेत असा आरोप मनसेने केला होता. या आरोपानंतर ढेरे यांच्याकडून आठवडाभरात स्पष्टीकरण मागवले होते, ते न आल्याने आज मनसेचे पदाधिकारी बीकेसी कोव्हीड सेंटरवर जावून कंत्राटदाराला जाब विचारला.

या ठिकाणी नेमण्यात आलेले अनेक डॉक्टर इतर ठिकाणी काम करतात असा आरोप सातत्याने होत आहे मात्र त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील मनसेच्या शिष्टमंडळाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...