आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यात आरोग्यसेवा कोलमडली:डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आता रोजंदारीवर घेणार; शासनाचा निर्णय

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यभरात आरोग्यसेवा कोलमडली आहे. परिणामी, आरोग्य विभागाने रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अजब पर्यायाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर दैनंदिन तत्त्वावर मनुष्यबळ नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, आरोग्यसेवा आयुक्त धीरजकुमार यांनी पत्राद्वारे संबंधितांना तशा सूचना दिल्या आहेत.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यातील ब, क, ड वर्गातील सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी १४ मार्चपासून संप पुकारला आहे. त्याचा फटका राज्यातील रुग्णसेवेवर होत आहे. यासंदर्भात शुक्रवारी एका बैठकीत आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार यांनी कंत्राटी तत्त्वावर मनुष्यबळ घेण्याच्या सूचना दिल्या

आदेश असे : रुग्णसेवेत बाधा येऊ नये यासाठी अपघात विभाग, आपत्कालीन कक्ष, रुग्णवाहिका सुसज्ज ठेवण्यात याव्यात. क्षेत्रीय स्तरावर राष्ट्रीय आरोग्य अभियान व इतर कार्यक्रमांतर्गत उपलब्ध कंत्राटी मनुष्यबळ नियुक्त करावे.

बातम्या आणखी आहेत...