आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल:​​​​​​​डोंबिवलीमधील अल्पवयीन मुलीवर 29 जणांचे अत्याचार; दोन अल्पवयीन मुलांसह 26 अटकेत, नावे ठेवली गुप्त

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कल्याणमधील पुढाऱ्यांची मुले असल्याचा संशय ​​​​​​​

१५ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीची अश्लील चित्रफीत बनवून या मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर २९ जणांनी मागील ९ महिन्यांपासून विविध ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून २ अल्पवयीन आरोपींसह २३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे, उर्वरित ६ आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी सहायक पोलिस आयुक्त सोनाली ढोले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.

पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि त्यापाठोपाठ मुंबईतील साकीनाका प्रकरण ताजे असतानाच ही घटना उघडकीस अाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. डोंबिवलीनजीक असलेल्या भोपर परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीची एका तरुणाशी ओळख होती. जानेवारी महिन्यात मुलीच्या प्रियकराने तिच्यावर अत्याचार करून व्हिडिओ तयार केला आणि त्यानंतर ब्लॅकमेल करण्यास सुुरुवात केली. याच व्हिडिओचा वापर करून त्याचे मित्र आणि इतरांनी तिच्यावर विविध ठिकाणी अत्याचार केल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली.

जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल २९ जणांनी डोंबिवली, रबाळे, वडवली, बदलापूर या विविध ठिकाणी तिला नेत सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. दोन दिवसांपूर्वी ७ आरोपींनी पीडितेला वडवली येथे नेत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर तिला प्रचंड वेदना होऊ लागल्याने तिने ही घटना आपल्या आईला सांगितली.

कल्याणमधील पुढाऱ्यांची मुले असल्याचा संशय
कल्याण ग्रामीण भागातील शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी या राजकीय पक्षांतील पुढाऱ्यांची मुले यात आरोपी असल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप आरोपींची नावे उघड केली नाहीत. दरम्यान, पीडितेला उपचारासाठी कळवा येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची तब्येत स्थिर आहे.
१. मानपाडा पोलिस स्टेशनसमोर राष्ट्रवादी व ‘रिपाइं’च्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

२. याप्रकरणी भादंवि कलम ३७६, ३७६ (३), ३७६ (ड), अ, कलम ४, ६, १० तसेच बाल लैंगिक गुन्हे प्रतिबंधक कायदा (पाेक्सो) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

३. यातील २४ आरोपींना पोलिसांनी कल्याण न्यायालयात सादर केले. न्यायालयाने आरोपींना २९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. २ अल्पवयीन आरोपींची भिवंडी बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...