आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे खडेबोल:कारणे सांगूच नका, औरंगाबादच्या पाणीपुरवठ्यावर तातडीने मार्ग काढा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेतील पाणीप्रश्नावरून रणकंदन माजल्यानंतर आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत केलेल्या आंदोलनानंतर आता हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशा शब्दांत फैलावर घेत पाणी पुरवठा करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडसावले.

विभागीय आयुक्त लक्ष घाला

मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाणी पुरवठा करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडसावले. सध्याच्या पाणी वितरणात आणखी जादा पाणी कसे उपलब्ध होईल, यासाठी विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्यरीतीने पाणी द्यावे, असे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज दिले. पाणी योजनेच्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्यास कठोर कारवाई करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

औरंगाबादला प्राधान्य द्या

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणे हे प्राधान्याचे काम असून शहर पाणीपुरवठा योजनेचे काम निधीअभावी रेंगाळणार नाही, याची दक्षता आपण शासन म्हणून घेत आहोत. शहराच्या पारोळ्यापर्यंत पाणी आणणे, ते साठविण्यासाठी टाक्या बांधणे ही कामे तातडीने करावी लागणार असून या योजनेचा काही भाग हा जायकवाडी प्रकल्पात असल्याने त्यासाठी केंद्रीय वन विभागाची परवानगी आवश्यक आहे,

परवानगीसाठी केंद्राला प्रस्ताव द्या

वन विभागाची परवानगी मिळविण्यासाठी वनविभागाने तातडीने केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या. तसेच औरंगाबाद शहराच्या 1680 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करण्यासाठी या योजनेचा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून नियमितपणे आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...