आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर आरोप:'महाराष्ट्राला रेमडेसिविर विकू नका अन्यथा परवाना रद्द करु, केंद्राची कंपन्यांना धमकी', नवाब मलिकांचे गंभीर आरोप

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत.

राज्यातील कोरोना परिस्थिती ही गंभीर बनली आहे. कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार आणि यामुळे तुटवडा भासत आहे. यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर असे आरोप केले आहे. महाराष्ट्राला रेमडेसिविर विकू नका अन्यथा तुमच्यावर कारवाई करु अशी धमकी केंद्राने कंपन्यांना दिली असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आरोप केले आहेत. ते म्हणाले की, 'महाराष्ट्र सरकारने 16 निर्यात कंपन्यांना रेमडेसिविरसाठी विचारले तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की केंद्र सरकारने त्यांना महाराष्ट्रात औषध पुरवू नये असे सांगितले आहे. तसेच या कंपन्यांना धमकी देण्यात आली आहे की, जर त्यांनी तसे केले तर त्यांचा परवाना रद्द केला जाईल. अशी धक्कादायक माहिती या कंपन्यांनी दिली आहे. हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत.

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता रेमडेसिविरची कमतरता भासत आहे. त्यामुळे आता या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारकडे या निर्यातदारांकडून रेमडेसिविरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशाराही मलिकांनी दिला आहे.

आपल्या देशात 16 निर्यात देणारे यूनिट्स आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिविरचे 20 लाख इंजेक्शन आहेत, कारण आता सरकारकडून निर्यातीवर बंदी घातली गेली आहे. हे निर्यातदार आपल्या देशात हे औषध विकायला परवानगी मागत आहेत. पण केंद्र सरकार त्यास नकार देत आहे.

बातम्या आणखी आहेत...