आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''परदेशातील परिस्थिती पहा. तेथे मेट्रोत, सार्वजनिक ठिकाणा गेल्यावर मुकाट व सरळ वागता इथे 'आवो जावो घर तुम्हारा' असे आहे, पण याचा फायदा घेऊ नका मेट्रोत कुठेही पचकन थुंकु नका, असले धंदे करु नका. मेट्रोत घाणही करू नका, हार्ट काढून त्यात बाण टाकू नका असा खोचक सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईकरांना दिली.
मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांवरील सेवा मुंबईकरांच्या सेवेत गुढीपाडव्यापासून रुजू झाली. मेट्रो 7 आणि मेट्रो 2-ए या मार्गावरील सेवांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी केले. त्यानंतर अजित पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबई शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची गुढी उभारली जात आहे. नको त्या चर्चेला जास्त महत्व दिले जाते व लोकांचे लक्ष विचलीत केले जाते. पण केंद्र व राज्य सरकार ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. विविध मुख्यमंत्री व मंत्री राज्याने बघितले. आम्ही सर्वजण आधी आघाडी सरकारमध्ये काम करीत होतो. सुरुवात व प्रकल्पाचा शेवट वेगवेगळ्या सरकारच्या काळात होतो.
कुठलाही प्रकल्प सहज उभा राहत नाही त्यासाठी झोकून देऊन काम करावे लागते. आगामी काळात विकासाच्या अशाच गुढ्या उभारल्या जाणार आहे. मुंबईचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या नैतृत्वाखाली काम सुरू आहेत. मुंबईकरांच्या जीवनात सुखाचे दिवस आणण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
सुखाचे दिवस म्हणजे काय तर सार्वजनिक सुविधा भक्कम, परवडणाऱ्या किंमतीत आरोग्य सुविधा शिक्षण व अन्नधान्य हवे. कोरोनाच्या खाईतून राज्याला बाहेर काढतानाच विकास कामांना खिळ बसु नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नैतृत्वात काम केले. जनतेचे जगणे सोपे करण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही अजित पवार म्हणाले. राजकारणातही अनेकजण बदलले.
मुख्यमंत्री मातोश्रीवरून वर्षा बंगल्यावर आले, विकासाचा गाडा मात्र थांबणार नाही असेही ते म्हणाले. आगामी काळात 14 मेट्रो मार्गाचे नियोजन असून ठाणे ते मुंबईच्या अखेरच्या टोकापर्यंत मेट्रो नेण्याचा मानस सरकारचा आहे असेही ते म्हणाले.
मुंबईकरांनो पचकन थुंकु नका!
मेट्रोत कुठेही पचकन थुंकु नका असले धंदे करु नका. मेट्रोत घाण करू नका, बाहेर हात काढू नका. परदेशातील परिस्थिती पहा. तेथे गेल्यावर मुकाट व सरळ वागता इथे आवो जावो घर तुम्हारा असे आहे याचा फायदा घेऊ नका असा खोचक सल्लाही त्यांनी दिली. मेट्रो लाईन 2A आणि 7 ची तिकिट दरे. मेट्रो सेवा आज रात्री 8:00 पासून सुरू करण्यात येईल.
यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी 4 लाख कोटींची कामे राज्यात व मुंबईत करणार आहोत. मुंबईचे मुंबईपण विकास करताना हरवणार नाही याची काळजीही घ्यायची आहे. मुंबईकरांच्या श्रमाला योग्य मोल मिळेल असे शहर घडवायचे असून सर्वात सुरक्षित शहर मुंबई आहे. मुंबई बलिदानातून मिळवली ती जपण्याचा व वाढवण्याचा संकल्प आपण करूया असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.