आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी द्या आणि भाजपशी युती करा असा सज्जड इशारा देणारे शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करु नये हा कठीण निर्णयस असला तरीही घ्यायला हवा अशी विनंती केली आहे.
वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी या विषयी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आपले मत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळविले आहे.
पत्र जशास तसे
माझ्याही मनात खंतच
आपल्या सेवेशी नम्रपणे निवेदन करते की स्थितीत निर्माण झालेल्या परिस्थीतीमुळे आपण व्यतीय झाला आहात. पक्षापुढे अचानकपणे आले आपणासमोर खुप गोठे आव्हान असल्याची कल्पना मला आहे. एक शिवसैनिक म्हणून मनातही याची खंत आहे.
ते आपलेच मावळे
आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर आपणास निर्णय घेण्याकरीता विनंती करीत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमतः हाडामासांचे शिवसैनिक आहेत. करीता त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही न करता कठीण असला तरी शिवसेनेकरीता निर्णय घ्यावा हीच संदेशी पुनश्च नम्र विनंती करते.
शिवसेना नेत्यांवर इडीची टाच
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक, मंत्री अनिल परब आदी नेत्यांवर इडीची टाच आहे. यात काही्ंची चौकशीही झाली त्याशिवाय संजय राऊत यांनाही इडीची नोटीस दिली गेली होती या धर्तीवर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी आपले मत मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.