आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायरस मिस्त्री मृत्यू प्रकरण:डाॅ. अनाहिताने सीट बेल्ट व्यवस्थित लावला नव्हता

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कार अपघातात मृत्यू प्रकरणात पालघर पोलिसांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. पोलिस म्हणाले, घटनेच्या वेळी कार चालवणाऱ्या डॉ. अनाहिता पंडोले यांनी सीट बेल्ट व्यवस्थित लावला नव्हता. हा दावा पोलिसांनी आपल्या दोषारोपपत्रातून केला आहे.

प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (५४) व त्यांचे मित्र जहांगीर पंडोले यांचा ४ सप्टेंबरला मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार अपघातात मृत्यू झाला होता. घटना घडली तेव्हा कार चालवणाऱ्या पंडोले यांच्या पत्नी अनाहिता यादेखील जखमी झाल्या होत्या. पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले, डॉ. अनाहिता यांनी सीट बेल्ट व्यवस्थित लावला नव्हता. अनाहिता यांनी मागून केवळ खांद्याचा हार्नेस घातला होता व लॅप बेल्ट अॅडजस्ट केला नव्हता. पालघर पोलिसांनी अनाहिता यांच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...