आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेल्या बालाजी तांबे (वय 81) यांची प्राणज्योत मंगळवारी मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल आणि संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे. तांबे यांची गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. यामुळे सर्वच स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ होते. त्यासोबतच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापकदेखील होते. विशेष म्हणजे बालाजी तांबे यांचा आयुर्वेद प्रसार प्रसारात मोठे योगदान आहे. त्यांनी जगभर यामाध्यमातून लोकांशी संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दरम्यान ते म्हणाले की, डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे.

बातम्या आणखी आहेत...