आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेनड्राईव्ह प्रकरण:डॉ. मुद्दसर लांबे यांची नियुक्ती फडणवीसांच्या काळात, आरोप जरूर करा पण चुकीचे काम नको, अजित पवारांचे प्रत्युत्तर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. मुद्दसर लांबे यांची नियुक्ती झाली तेव्हा राष्ट्रवादी सरकारमध्ये नव्हती. तेव्हा भाजप- शिवसेनेचे सरकार होते. त्या सरकारमध्ये भाजपने शिवसेनेला किती अधिकार दिला होता हे आपल्यालाही माहिती आहे. कोणी चूक केली असेल तर त्यांच्यावर जरूर आरोप करावा. पण चुकीचे काम करण्यासाठी जनतेने प्रतिनिधित्व दिलेले नाही अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचा समाचार घेतला.

वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. मुद्दसर लांबे यांचे दाऊदबरोबर असलेल्या संबंधाच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप विधानसभेत सादर करत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दाऊदच्या हस्तकांचा भरणा असल्याचा आरोप केला होता. वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. लांबे आणि मोहमद अरशद खान यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप फडणवीस यांनी सभागृहात सादर केली होती. त्यासंबंधी अजित पवार यांनी सविस्तर उत्तर दिले.

काय म्हणाले अजित पवार?

डॉ. मुद्दसर लांबे यांची नियुक्ती निवडणुक प्रक्रियेतून झाली. मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत ही प्रक्रिया पार पडली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. लांबे यांनी सदस्यत्व प्रदान केले,” असे अजित पवार यांनी फडणवीसांच्या आरोपांना उत्तर दिले.

तेव्हा होते फडणवीसांचेच सरकार

वक्फ बोर्डाच्या सदस्याची नियुक्ती निवडणुकीद्वारे करण्यात येते. विविध क्षेत्रातील १२ लोक नियुक्त करण्याची तरतूद आहे. या सदस्यांची निवडणुक ३१ ऑगस्ट २०१९ रोजी झाली. त्यावेळी आमचे सरकार नव्हते. देवेंद्र फडणवसी यांचे सरकार होते. “एवढे सगळे असतानाही धडधडीतपणे सांगण्यात आले की डॉ. लांबे यांचा नियुक्ती महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आली. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांचे दाऊद सोबत संबंध असल्याचे सांगून त्यांची बदनामी करण्यात आली असेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...