आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिस:दृश्यम-2 सर्वाधिक ओपनिंगचा रिमेक; पहिल्या दिवशी 15 कोटी रुपयांची कमाई

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूडसाठी सुखद बातमी आहे. अजय देवगण अभिनीत दृश्यम-२ ने पहिल्याच दिवशी विक्रम केला आहे. हा या वर्षातील सर्वात जास्त पहिल्या दिवसात गल्ला करणारा बॉलीवूड रिमेक ठरला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या दृश्यम-२ ने पहिल्याच दिवशी १५.३८ कोटी रु.चे कलेक्शन केले. याआधी लालसिंग चढ्ढाने ११.७० कोटी रु.चे ओपनिंग-डे कलेक्शन केले होते. एवढेच नव्हे तर या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या सुमारे ३३ बॉलीवूड चित्रपटांपैकी ब्रह्मास्त्रनंतर(३६ कोटी रु.) ही दुसरी सर्वात मोठी ओपनिंग आहे. मात्र, दक्षिणेतील चित्रपट जोडल्यास केजीएफ-२ आणि आरआरआरशिवाय कोणताही चित्रपट ओपनिंग-डे कलेक्शनमध्ये दृश्यम-२ च्या पुढे नाही. याआधी या वर्षी ४ मोठे रिमेक चित्रपट(लालसिंग चढ्ढा, हिट-द फर्स्ट केस, विक्रम वेधा, जर्सी) आले आहेत. मात्र, तिकीट बारीवर त्यांनी विशेष चमक दाखवली नाही.

हे सुपरहिट रिमेक; कबीर सिंह, सिंघम, वाँटेड, गजनी, हाउसफुल, सिंबा, भूल भुलैया, बागी-2, रहना है तेरे दिल में, साथिया आणि हेराफेरी.

रिमेक चित्रपट पहिला दिवस दृश्यम-2 15.38 कोटी लालसिंग चढ्ढा 11.70 कोटी विक्रम वेधा 10.58 कोटी जर्सी 2.93 कोटी हिट- फर्स्ट केस 1.35 कोटी

बातम्या आणखी आहेत...