आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Drivers No Longer Have To Go To The RTO Office; 6 Services Launched Online, Now You Will Get Faceless Services, Transport Minister Adv. Information About Parab

मुंबई:वाहनचालकांना आता आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही; 6 सेवा ऑनलाइन सुरू, आता मिळणार फेसलेस सेवा, परिवहनमंत्री ॲड. परब यांची माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या ११५ सेवांपैकी ८० सेवा ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत आहेत. आता आरटीओ कार्यालयात वाहनचालक (लायसन्स) परवान्याचे नूतनीकरण, दुय्यम वाहनचालक परवाना, वाहनचालक परवान्यातील पत्ता बदल, दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्राचा पत्ता बदल, तसेच बाहेरील राज्यात जाण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र या सहा सेवा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहेत. या सेवांचे लोकार्पण परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले.

परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, सहपरिवहन आयुक्त दिनकर मनवर, एनआयसीचे तांत्रिक संचालक दीपक सोनार यांची उपस्थिती होती. या वेळी मंत्री परब म्हणाले, विभागामार्फत ११५ परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, परवाना संबंधित सेवा देण्यात येत असून केंद्र शासनाच्या सूचनांनुसार ८० सेवा ऑनलाइन आहेत. आज सहा सेवांचा त्यात समावेश केला आहे.

११५ पैकी ८० ऑनलाइन
- 115 आरटीओ सेवांपैकी
80 सेवा आता ऑनलाइन आहेत

- 06 ऑनलाइन सेवांचा आता यामध्ये नव्याने समावेश झाला - 20 लाख लोकांना याचा लाभ मिळण्याचा परिवहनमंत्र्यांचा दावा - 30,000 अर्ज प्राप्त होतात वर्षभरात ना-हरकत प्रमाणपत्रांसाठी - 20,000 अर्ज येतात नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलासाठी - 02 लाख अर्ज येतात परवान्याच्या दुय्यमीकरण प्रमाणपत्रासाठी - 14 लाख अर्ज दाखल होतात परवान्याच्या नूतनीकरणासाठी

बातम्या आणखी आहेत...