आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट:ड्रोन, मिसाइल आणि एअरक्राफ्टने मुंबईवर हल्ल्याचा इशारा, एक महिन्यापर्यंत मुंबईमध्ये फ्लाइंग ऑब्जेक्टवर घातली बंदी

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कायदा व्यवस्था बिघडवण्यासोबतच सार्वजनिक संपत्तीलाही नुकसान पोहोचवले जाऊ शकते.

महाराष्ट्राच्या गुप्त विभागाला शंका आहे की, देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पुन्हा एकदा मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. यावेळी हा हल्ला ड्रोन किंवा मिसाइलच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. गुप्तचर विभागाच्या पत्रानंतर मुंबई पोलिसांनी अलर्ट जारी करुन शहराच्या सर्व प्रमुख स्थानांच्या सुरक्षेच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबई पोलिसांच्या डिप्टी कमिश्नर (ऑपरेशन) च्या कार्यालयाने जारी केलेल्या सतर्कतेनुसार दहशतवादी आणि राष्ट्रद्रोही लोक ड्रोन, रिमोट ऑपरेट मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरियल मिसाईल किंवा पॅरा ग्लायडरच्या माध्यमातून हा हल्ला करू शकतात.

व्हीव्हीआयपी चेहऱ्यांना बनवले जाऊ शकते निशाणा
अलर्टमध्ये ही देखील शंका व्यक्त केली आहे की, दहशतवादी गर्दीच्या ठिकाणी आणि व्हीव्हीआयपीला निशाणा बनवू शकतात. कायदा व्यवस्था बिघडवण्यासोबतच सार्वजनिक संपत्तीलाही नुकसान पोहोचवले जाऊ शकते.

1 महिना मुंबईमध्ये उडणारे ऑब्जेक्ट्सवर बंदी
गुप्तचर विभागाचे इनपुट लक्षात घेता पोलिसांनी मुंबईमध्ये कोणत्याही फ्लाइंग ऑब्जेक्ट (उडवले जाणारे उपकरणे इत्यादी)वर बंदी घातली आहे. पोलिसांनुसार हा आदेश पुढचा आदेश येईपर्यंत किंवा एक महिना लागू राहिल. जर एखाद्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्याविरोधात आयपीसीची कलम-188 नुसार केस दाखल केली जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...